लग्न लवकर लाव, म्हणत नवरदेवाने केली भटजीची धुलाई

लखनौ : भटजींकडून लग्नाचे विधी सुरू असतानाच ते लवकर पार पाडा, असा लकडा नवरदेवाने लावला. त्यावर भटजींनी आपण घाई करू शकत नाही, असे बजावले. यावरून नवरदेव संतापला आणि त्याने लग्नाच्या मंडपातच भटजीची धुलाई केली. यात भटजींचे डोके फुटले आहे.
साहजिकच, हा चर्चेचा विषय बनला आहे. मेरठचा रहिवासी असलेला सोनूसिंह जाटव पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याचे लग्न निगोहातील तरुणीशी ठरल्यानंतर रात्री 1 च्या सुमारास भटजींनी विधी सुरू केले. यावेळी नवरदेवाने लवकर लग्न लावण्यास सांगितले. मात्र, त्यावरून दोघांमध्ये वाद उफाळला. सोनूने भटजी विवेक शुक्ला यांना आधी शिवीगाळ आणि नंतर मारहाण केली. यामुळे विवेक रक्तबंबाळ झाले.
Latest Marathi News लग्न लवकर लाव, म्हणत नवरदेवाने केली भटजीची धुलाई Brought to You By : Bharat Live News Media.
