Jalgaon News : सरपंच पदाचा उमेदवारच निघाला चोर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात घरफोड्या, मोटरसायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला ताब्यात घेऊन 31 घरफोड्या उघड केल्या आहेत. आरोपीने वीस गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल … The post Jalgaon News : सरपंच पदाचा उमेदवारच निघाला चोर appeared first on पुढारी.

Jalgaon News : सरपंच पदाचा उमेदवारच निघाला चोर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात घरफोड्या, मोटरसायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला ताब्यात घेऊन 31 घरफोड्या उघड केल्या आहेत. आरोपीने वीस गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल व सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार प्रवीण पाटील यांचा पराभव झाला. या उमेदवाराने निवडणुकीत चांगलाच पैसा खर्च केला. पैसा खर्च करूनही त्याचा पराभव झाला मात्र त्याच्या रुबाबात कोणताही फरक पडला नाही. त्याच्या प्रगती मागील कारणांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेतले. आरोपी प्रवीण पाटील याला पोलिसी खाक्या मिळाल्यानंतर त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्याने जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर वीस ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुली दिली आहे.
आरोपी हा पोलिसांच्या नाकासमोर असूनही पोलिसांच्या हाती लागत नव्हता  ही विशेष बाब आहे. आरोपी प्रवीण पाटील यांनी निवडणूकीत केलेला खर्च व त्याचा झगमगाट पाहून त्याच्यावर वाढलेल्या संशयामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी प्रवीण सुभाष पाटील (वय 32) याला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले. तीन दिवसांपासून या सर्व गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
हेही वाचा :

अडकलेल्या मजुरांशी व्हिडीओ संपर्क साधण्यात यश; दहा दिवसांनी दिसले 41 जणांचे चेहरे
Maratha Reservation : कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड

The post Jalgaon News : सरपंच पदाचा उमेदवारच निघाला चोर appeared first on पुढारी.

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात घरफोड्या, मोटरसायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला ताब्यात घेऊन 31 घरफोड्या उघड केल्या आहेत. आरोपीने वीस गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल …

The post Jalgaon News : सरपंच पदाचा उमेदवारच निघाला चोर appeared first on पुढारी.

Go to Source