ओबीसींना प्रतिनिधित्व देणाऱ्यांच्या आम्ही पाठिशी : डॉ. बबनराव तायवाडे
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाकडून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे. जे ओबीसींना प्रतिनिधित्व देतील त्यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उभा राहील, असे ओबोसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज (दि.१) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
तायवाडे म्हणाले की, संपूर्ण देश ओबीसीमय झाला असून आता आपल्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी आमच्या लोकसंख्येनुसार त्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. शेवटी ‘जो ओबीसीके हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ‘हे महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी संवैधानिक अधिकार मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांना उमेदवार केल्यास समाजाला न्याय मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा
बिल गेटस्नी पिला नागपूरच्या चहावाल्याचा चहा!
नागपूर : बेसा परिसरात वैद्य इंडस्ट्रीत भीषण आग
नागपूरच्या युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला दोन फिल्मफेअर पुरस्कार
Latest Marathi News ओबीसींना प्रतिनिधित्व देणाऱ्यांच्या आम्ही पाठिशी : डॉ. बबनराव तायवाडे Brought to You By : Bharat Live News Media.