मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरु होणार असून २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या तारखेसोबतच सत्र ६ च्या परीक्षेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. यातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ ची परीक्षा २२ … The post मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर appeared first on पुढारी.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरु होणार असून २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या तारखेसोबतच सत्र ६ च्या परीक्षेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.
यातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ ची परीक्षा २२ मार्च तर तृतीय वर्ष बीए व बीएस्सी सत्र ६ च्या परीक्षा ३ एप्रिल, बीए एमएमसी सत्र ६ ची परीक्षा १६ एप्रिल व बीकॉम स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रमाच्या सत्र ६ च्या परीक्षा १५ एप्रिल रोजी सुरू होणार आहेत.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
सत्र ६ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
परीक्षेच्या तारखेसोबतच पदवी परीक्षेच्या सत्र ६ च्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे. इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येईल. परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये देण्यात येतील.
महत्वाच्या परीक्षांच्या तारखा
परीक्षा तारीख
१. बीकॉम सत्र ६ : २२ मार्च २०२४
२. बीए सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
३. बीएस्सी सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
४. बीएस्सी – कॉम्प्युटर सायन्स, आयटी व बायोटेक. सत्र ६ : १९ एप्रिल २०२४
५. बीए एमएमसी सत्र ६ : १६ एप्रिल २०२४
६. बीकॉम फिनांशियल मार्केटस, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट, बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र व बीएमएस सत्र ६ : १५ एप्रिल २०२४
उन्हाळी सत्राच्या परीक्षा नियोजित वेळेवर घेणे, वेळेत मूल्यांकन करून, निर्धारित वेळेत निकाल जाहिर करणे याचे नियोजन करण्यात आलेले आहे. – डॉ. पूजा रौंदळे, संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.
Latest Marathi News मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.