वाशिम: कारंजा तहसीलमधील दस्तलेखनिकाचा चाकूने वार करून खून

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: कारंजा तहसीलमध्ये खासगी दस्तलेखनिकावर अज्ञात व्यक्तीने अचानक येऊन मानेवर चाकू हल्ला केला. यात दस्तलेखनिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१) दुपारच्या सुमारास कारंजा तहसीलसमोरील गेट समोर घडली. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, आज दुपारच्या वेळी हरिश्चंद्र मेश्राम हे खाजगी दस्त लेखक आपले काम करीत असताना अचानकपणे एका अज्ञाताने त्यांच्या मानेवर … The post वाशिम: कारंजा तहसीलमधील दस्तलेखनिकाचा चाकूने वार करून खून appeared first on पुढारी.

वाशिम: कारंजा तहसीलमधील दस्तलेखनिकाचा चाकूने वार करून खून

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा: कारंजा तहसीलमध्ये खासगी दस्तलेखनिकावर अज्ञात व्यक्तीने अचानक येऊन मानेवर चाकू हल्ला केला. यात दस्तलेखनिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१) दुपारच्या सुमारास कारंजा तहसीलसमोरील गेट समोर घडली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, आज दुपारच्या वेळी हरिश्चंद्र मेश्राम हे खाजगी दस्त लेखक आपले काम करीत असताना अचानकपणे एका अज्ञाताने त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर हल्ला करून पसार झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा 

वाशिम: कारंजा, मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीने पिके भुईसपाट, पक्ष्यांचा मृत्यू
वाशिम : एकबुर्जी गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत विषारी औषध मिसळले
वाशिम येथे आमदार राजेंद्र पाटणी यांना निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय

Latest Marathi News वाशिम: कारंजा तहसीलमधील दस्तलेखनिकाचा चाकूने वार करून खून Brought to You By : Bharat Live News Media.