
Bharat Live News Media ऑनलाई डेस्क : हंबल मोशन पिक्चर्स निर्मित आणि स्मीप कांग दिग्दर्शित, कॅरी ऑन जट्टा 3 (Carry On Jatta 3) हिंदी भाषेत प्रदर्शित होण्यास तयार आहे. १५ मार्च २०२४ रोजी केवळ डिस्ने+ हॉटस्टारवर हिंदीमध्ये याचा टीझर पाहता येईल. १५ मार्च पासून डिस्ने+ हॉटस्टारवर हिंदीमध्ये पाहता येईल. गिप्पी ग्रेवाल, सोनम बाजवा आणि कविता कौशिक आणि इतर अनेक कलाकार यामध्ये असतील. (Carry On Jatta 3)
OTT प्लॅटफॉर्मने लिहिलं, ‘मजाचं मजा, स्वादचं स्वाद ‘कॅरी ऑन जट्टा ३’ १५ मार्चपासून हिंदीमध्ये स्ट्रीमिंग.’
‘कॅरी ऑन जट्टा ३’ मध्ये गिप्पीची जोडी पंजाबी अभिनेत्री सोनम बावजासोबत बनली होती. गिप्पी ग्रेवालचा चित्रपट ‘कॅरी ऑन जट्टा ३’ २९ जून, २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल झाला होता. १५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०२.७५ कोटी रुपयांहून अधिक कारोबार केला होता. आता ‘कॅरी ऑन जट्टा ३’ ओटीटीवर पाहता येईल.
Latest Marathi News ‘कॅरी ऑन जट्टा 3’ ओटीटीवर रिलीज होण्यास तयार Brought to You By : Bharat Live News Media.
