ठाणे: मुंब्रा येथे पोलिसाला चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांची धिंड

ठाणे: पुढारी वृत्तसेवा: नो पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी टोइंग करून उचलली, याचा राग आल्याने दोघा तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चाकू दाखवून धमकी दिल्याची घटना मुंब्रात घडली होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दानिश शेख व अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपींना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून … The post ठाणे: मुंब्रा येथे पोलिसाला चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांची धिंड appeared first on पुढारी.

ठाणे: मुंब्रा येथे पोलिसाला चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांची धिंड

ठाणे: Bharat Live News Media वृत्तसेवा: नो पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी टोइंग करून उचलली, याचा राग आल्याने दोघा तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चाकू दाखवून धमकी दिल्याची घटना मुंब्रात घडली होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दानिश शेख व अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपींना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांनी ज्या परिसरात दहशत पसरवली होती. त्याच परिसरातून पोलिसांनी दोघांची धिंड काढली. गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.
मुंब्रातील रेल्वे स्टेशन परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. वाहतूक शाखेच्या मुंब्रा उपविभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अशोक देशमुख हे टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांसोबत ही कारवाई करीत होते. यावेळी नो पार्किंगमध्ये उभी असलेली एक स्कुटी उद्घोषणा करून देखील कुणीही न हटवल्याने टोइंग कर्मचाऱ्यांनी ती उचलून जमा केली. त्याच वेळी काही अंतरावर गेल्यावर दोघे तरुण टोइंग व्हॅनजवळ आले व त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर फरशीने टोइंग व्हॅनची काच देखील फोडली.
वाहतूक पोलीस देशमुख व टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी या दोघा तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने त्याच्याकडील चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकू हवेत फिरवून व शिवीगाळ करून मारहाण करीत परिसरात दहशत माजवली. या प्रकरणी वाहतूक पोलीस हवालदार देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दानिश अश्रफअली शेख व अन्य एका अनोळखी व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे, दहशत माजवणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. पोलिसांनी या दोघांची मुंब्रा शहरातून धिंड काढली व नागरिकांनी अशा गुंडांच्या दहशतीला अजिबात भयभीत होऊ नये, असे आवाहन केले.
हेही वाचा 

महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्राईम रेट ठाणे-कल्याणमध्येच : सुषमा अंधारे
ठाणे : लग्नात कार दिली नाही म्हणून महिलेचा छळ; भावाला मारहाण
ठाणे: भिवंडीत ७ पिस्तुल, १० जिवंत काडतुसे जप्त; एक अटकेत

Latest Marathi News ठाणे: मुंब्रा येथे पोलिसाला चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांची धिंड Brought to You By : Bharat Live News Media.