बुलढाणा : फार्महाऊससाठी जमिन बळकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : फार्महाऊससाठी एका महिलेची दीड एकर शेतजमीन जबरीने बळकावल्याप्रकरणी शिंदे गट शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्यासह एकूण पाच जणांवर मोताळा न्यायालयाच्या आदेशानुसार बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा-मोताळा महामार्गालगत राजूर शिवारात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जबरीने अतिक्रमण करून आपली … The post बुलढाणा : फार्महाऊससाठी जमिन बळकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

बुलढाणा : फार्महाऊससाठी जमिन बळकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

बुलढाणा, Bharat Live News Media वृत्तसेवा : फार्महाऊससाठी एका महिलेची दीड एकर शेतजमीन जबरीने बळकावल्याप्रकरणी शिंदे गट शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्यासह एकूण पाच जणांवर मोताळा न्यायालयाच्या आदेशानुसार बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा-मोताळा महामार्गालगत राजूर शिवारात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जबरीने अतिक्रमण करून आपली शेतजमीन बळकावली आणि जमिनीवरील कुंपण काढून उत्खनन करून मुरूम काढला. तिथे अवैधरित्या फार्महाऊस बांधले आहे, अशी तक्रार रीटा उपाध्याय (रा. नागपूर) या महिलेने केली होती.
आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास पोलिस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने रीटा उपाध्याय यांनी मोताळा येथील न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याप्रकरणात आमदार संजय गायकवाड, त्यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड तसेच सोमनाथ चौबे, दिपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बोराखेडी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
Latest Marathi News बुलढाणा : फार्महाऊससाठी जमिन बळकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.