धक्कादायक! पॅलेस्टिनींवर इस्रायली सैन्याचा गोळीबार; १०० ठार; ७५० हून अधिक जखमी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरुच आहे. याचे पडसाद अजुनही उमटत आहेत. नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाझा पट्टीवर दुष्काळ पडत असताना त्यांच्या कुटूंबासाठी धान्य मिळवण्याचा प्रयत्नात असलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायली सैन्याने गोळीबार केल्याने १०० हून अधिक नागरीक ठार झाले आहेत तर सुमारे ७५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने गोळीबार केल्याचा दावा गाझा अधिकाऱ्यांनी केला आहे. (Israel-Gaza war)
Israel-Gaza war : १०० ठार; ७५० हून अधिक जखमी
माहितीनुसार, गाझा शहराच्या नैऋत्येला दुष्काळामुळे लोक अन्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो लोकांवर इस्रायली सैन्याने गोळीबार केल्याने १०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि सुमारे ७५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वेढा घातलेल्या एन्क्लेव्हला उपासमारीचे संकट आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (दि.२९) सांगितले की कमीतकमी १०० लोक मारले गेले आणि ७५० हून अधिक जखमी झाले, पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे थंड रक्ताचे “हत्याकांड” असल्याचे म्हणत त्याचा निषेध केला. हा हल्ला इस्रायलच्या चालू असलेल्या “नरसंहाराच्या युद्धाचा” भाग असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला नागरिकांचे संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणून युद्धविराम तयार करण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. घटनास्थळी असलेल्या एका साक्षीदारांने सांगितले की, लोक अल-रशीद रस्त्यावर जमले होते तिथे पीठ वाहून नेणारे मदत ट्रक वाटेत होते. आम्ही पीठ आणायला गेलो होतो. इस्रायली सैन्याने आमच्यावर गोळ्या झाडल्या. जमिनीवर अनेकजण कोसळले. येथे प्रथमोपचार नाही आहेत.
युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या घटनेचा निषेध केला आणि म्हटले आहे की “गाझामधील हताश नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे,
हेही वाचा
Bengaluru Rameshwaram Cafe | बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट, ४ जखमी
Maharashtra Politics | शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भूसे आपआपसात भिडले, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला
Latest Marathi News धक्कादायक! पॅलेस्टिनींवर इस्रायली सैन्याचा गोळीबार; १०० ठार; ७५० हून अधिक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.