Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एक्सेल एंटरटेनमेंटचा नवा चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस’च्या स्टारकास्टची घोषणा करण्यात आली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट जबरदस्त एंटरटेनमेंट घेऊन येणार आहे. (Madgaon Express) ‘मडगाव एक्सप्रेस’मध्ये दिव्येंदु शर्मा, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा अल्टीमेट ट्रायो ‘मडगाव एक्सप्रेस’मध्ये स्वार होऊन लवकरच हास्याचे फवारे घेऊन चित्रपटगृहात पोहोचणार आहेत. एक्सेल एंटरटेनमेंटने चित्रपटाच्या कास्टसोबत चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटदेखील अधिकृत जाहिर करण्यात आली आहे. (Madgaon Express)
तीन मित्रांची कहाणी आहे मडगाव एक्सप्रेस!
‘मडगाव एक्सप्रेस’ बालपणाचे तीन मित्र डोडो (दिव्येंदु), पिंकू (प्रतीक गांधी) आणि आयुष (अविनाश तिवारी) ची कहाणी आहे. जे गोवा जाऊ इच्छितात. पण त्यांची गाडी ऑफ ट्रॅक होते. या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग आणि दिग्दर्शन कुणाल खेमूने केलं आहे. या चित्रपटातून कुणाल खेमू दिग्दर्शनात डेब्यू करत आहे. ‘मडगाव एक्सप्रेस’ मध्ये दिव्येंदु, प्रतीक आणि अविनाश यांच्याशिवाय नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम देखील महत्वाच्या भूमिकेत असतील.
View this post on Instagram
A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)
View this post on Instagram
A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)
Latest Marathi News तुफान धुमाकूळ घालायला येतोय कुणाल खेमूचा ‘मडगाव एक्सप्रेस’ Brought to You By : Bharat Live News Media.