आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाचा झटका, याचिका फेटाळली
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा आसाराम बापूला आज सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या आसाराम बापूच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील रुग्णालयात उपचारासाठी आसारामला राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील रुग्णालयात उपचारासाठी आसारामला राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्रात पोलीस कोठडीत असताना आसारामने आयुर्वेदिक उपचाराचीही मागणी केली होती, त्यावर न्यायालयाने त्याला राजस्थान उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आसाराम बापूच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. खरे तर, आसारामला पोलिस कोठडीऐवजी स्वत:च्या इच्छेने उपचार करू दिले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे सांगत उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्याचा चौथा अर्ज फेटाळला होता.
कोर्टाने म्हटले की, अपीलकर्त्याचे फॅन फॉलोइंग लक्षात घेता, पोलिस कोठडीत असतानाच त्याला रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी, असे आमचे मत आहे.
हेही वाचा :
अभिषेक घोसाळकर खूनप्रकरण: मॉरीसच्याही मृत्यूची चौकशी करा: विलास पोतनीस
Bengaluru Rameshwaram Cafe | बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट, ४ जखमी
मराठा आरक्षणाला आव्हान: गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका
Latest Marathi News आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाचा झटका, याचिका फेटाळली Brought to You By : Bharat Live News Media.