गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक
जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथील महिलांची गॅस एजन्सी मालकाने फसवणूक केली आहे. उज्वला गॅस योजनेअंतर्गत 100 रुपयांत मिळणारा गॅस 2 हजार रुपयांमध्ये देऊन महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गॅस एजन्सी मालकासह दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरीब गरजू महिलांना १०० रूपयांमध्ये गॅस देण्याची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना चाळीसगाव तालुक्यातील दहीवद या गावात राहणाऱ्या महिला प्रज्ञा नितीन देवरे (वय ३०) या महिलेला राजेश्वरी गॅस एजन्सीचे मालक मयूर जाधव, ऋषीकेश सुरेश मोरे आणि प्रविण भावराव अहिरे सर्व रा. चाळीसगाव यांनी १०० रूपयात मिळणार गॅस २ हजार रूपयांमध्ये देवून फसवणूक केली.
त्यांनी या महिलेसह परिसरातील महिलांची देखील फसवणूक केली आहे. हा प्रकार (दि. २३) रोजी उघडकीला आल्यानंतर महिलेने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता राजेश्वरी गॅस एजन्सीचे मालक मयूर जाधव, ऋषीकेश सुरेश मोरे आणि प्रविण भावराव अहिरे सर्व रा. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.
हेही वाचा :
अभिषेक घोसाळकर खूनप्रकरण: मॉरीसच्याही मृत्यूची चौकशी करा: विलास पोतनीस
Online Fraud : डोंबिवलीत तरुणाची ऑनलाईनद्वारे 33.28 लाखांची फसवणूक
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: ३० दिवसांच्या आत आपल्या बँक खात्यात सबसिडी कशी मिळवावी?
Latest Marathi News गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.