ड्रायव्हरची दिशाभूल करुन कारमधूल लांबवले दीड लाख

जळगाव- दुकान बंद करून दुकान मालक घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी गाडीचे ऑइल गळत आहे, अशी दिशाभूल करुन डाव साधला. कार चालकीची व दुकान मालकाची दिशाभूल करुन गाडीत ठेवलेले दीड लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. अधिक माहितीनुसार, गोपाल काशिनाथ पलोड हे त्यांचे महात्मा गांधी रोड नवी पेठ भागात असलेले दुकान … The post ड्रायव्हरची दिशाभूल करुन कारमधूल लांबवले दीड लाख appeared first on पुढारी.

ड्रायव्हरची दिशाभूल करुन कारमधूल लांबवले दीड लाख

जळगाव- दुकान बंद करून दुकान मालक घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी गाडीचे ऑइल गळत आहे, अशी दिशाभूल करुन डाव साधला. कार चालकीची व दुकान मालकाची दिशाभूल करुन गाडीत ठेवलेले दीड लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे.
अधिक माहितीनुसार, गोपाल काशिनाथ पलोड हे त्यांचे महात्मा गांधी रोड नवी पेठ भागात असलेले दुकान रात्री बंद करुन गाडीने घरी जात असताना वीस ते पंचवीस वयोगटातील दोन तरुण मोटरसायकलवर आले. त्यांनी पलोड यांच्या गाडीची काच वाजून पलोड यांच्या मुलाला म्हणाले की तुम्हारे गाडी का ऑइल गिर रहा है असे सांगून दिशाभूल केली. त्यांचे व त्यांच्या ड्रायव्हरचे लक्ष विचलित करून गाडीत असलेली बॅग व त्यामध्ये असलेली दीड लाख रुपये रोख सोबत बॅग मध्ये असलेले चेकबुक, पॉलिसीचे कागदपत्र व दोन हजार रुपये किमतीच्या दुकानाच्या चाव्या असे सर्व घेऊन पसार झाले. (दि. 29) हा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.
हेही वाचा :

महिलांपाठोपाठ आता तरुणाईला भाजपची साद; सोमवारी नमो युवा महासंमेलन
कळंबोलीत ट्रकची टेम्पोला धडक, एकाचा मृत्यू

Latest Marathi News ड्रायव्हरची दिशाभूल करुन कारमधूल लांबवले दीड लाख Brought to You By : Bharat Live News Media.