अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बडगुजर यांनी जामीनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी झालेल्या इतरांविरोधातही गुन्हा … The post अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न appeared first on पुढारी.

अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बडगुजर यांनी जामीनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी झालेल्या इतरांविरोधातही गुन्हा दाखल असून त्यात भाजपचा पदाधिकारी व्यकंटेश मोरे याचाही समावेश आहे. त्यामुळे बडगुजर, व्यंकटेश मोरे सह इतरांविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बडगुजर यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
दरम्यान, जिल्हाप्रमुखपद मिळाल्यामुळे ग्रामीण भागातही ठाकरे गटाचा झंझावात निर्माण होऊ शकतो, या भितीपोटी सत्ताधारी गटाने मला डॅमेज करण्याचा प्रकार केला असावा. राजकीय व्देषापोटी सुरू असलेले प्रकार जनता पाहत आहेत. त्यामुळे ते संबंधितांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणी बडगुजर यांनी केली आहे.
हेही वाचा :

Leap year : आता आमचा वाढदिवस चार वर्षांनी होणार साजरा
DeepVeer : गर्दीत रणवीरने दीपिकाला असे केले प्रोटेक्ट, जामनगरमध्ये अंबानींच्या सोहळ्याला हजेरी
Lok Sabha elections 2024 | लोकसभेसाठी ‘माविआ’चं ठरलं! ठाकरे २१ जागा लढणार, ‘वंचित’, ‘स्वाभिमानी’ला किती जागा?

Latest Marathi News अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.