सोलापूर : घरातील शक्तिशाली स्फोटात एकाचा मृत्यू
सोलापूर वृत्तसेवा : घरात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मृत अतुल बाड यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
ही घटना आज (शुक्रवार) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथील एका बिल्डिंगमध्ये घडली. अतुल आत्माराम बाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, दिपक विठोबा कुटे (रा. शिवापुरी ता. आटपाडी) असे जखमीचे नाव आहे. दरम्यान मध्यरात्री स्फोटाच्या आवाजाने सुमारे १ किमी परिसर हादरून गेल्याने लोक घराबाहेर पळाले. दुकानाचे समोरील शटर सुमारे २५० फूट अंतरावर फेकले गेले. या दुर्घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला तातडीने पंढरपूर येथे उपचारसाठी हलवले.
हेही वाचा :
Nashik News | ‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग
Nipani car accident ; देवदर्शनाला जाताना कारचा गुडस गावाजवळ अपघात; कुटुंबातील ९ जण जखमी
National Science Day : लिंबू-मिरची तोडा, विज्ञानाशी नाते जोडा
Latest Marathi News सोलापूर : घरातील शक्तिशाली स्फोटात एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.