बेळगाव : टस्कर हत्तीचा शहरात फेरफटका; नागरिकांत खळबळ
बेळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा अन्नाच्या शोधात जंगलातून आलेला टस्कर हत्ती आज (शुक्रवार) पहाटे शाहुनगरमध्ये फेरफटका मारून कंग्राळीमध्ये दिसल्याने लोकांमध्ये एकच खळबळ माजली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मॉर्निंगवॉकला गेलेल्या लोकांना अचानक टस्कर हत्तीचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली. ही बाब शहरात पसरताच टस्कर पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर टस्कर हत्ती उचगावच्या दिशेने निघून गेला. वनविभागाचे अधिकारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गतवर्षी बिबट्याने शहरात खळबळ उडवून दिली होती. आता टस्कर हत्तीच्या दर्शनाने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर काहीजण मोबाईलवर सेल्फी काढत हत्ती फिरत असलेला व्हिडिओ काढून व्ह्यायरल करत आहेत.
हेही वाचा :
नियम बदल : एलपीजी सिलिंडर ते FASTag केवायसीपर्यंत… आजपासून देशात लागू झाले ‘हे’ ५ मोठे बदल
Maharashtra SSC Board Exam 2024 : दहावी परीक्षांना आजपासून प्रारंभ
संकेश्वरजवळ शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक; सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले
Latest Marathi News बेळगाव : टस्कर हत्तीचा शहरात फेरफटका; नागरिकांत खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.