मावडी कडेपठार येथे अफूची शेती : दोघांवर पोलिसांची कारवाई
जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील मावडी कडेपठार गावातील एका शेतामध्ये बेकायदेशीरपणे अफूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. जेजुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 29) या शेतावर छापा मारून सुमारे 76 हजार रुपये किमतीची 38 किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. अफूची शेती करणार्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली. किरण पुंडलिक जगताप (वय 40) व रोहिदास चांगदेव जगताप (वय 55, रा. मावडी कडेपठार, ता. पुरंदर) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मावडी कडेपठार गावातील किरण जगताप व रोहिदास जगताप यांच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूची लागवड केली असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे पाटील, पोलिस हवालदार तात्यासाहेब खाडे, सोमनाथ चितारे, हिरामण पवार, शुभम भोसले, भानुदास सरक, नाना घोगरे यांनी अफूच्या शेतीवर छापा मारून कारवाई केली.
हेही वाचा
NMC Nashik | महापालिकेचा ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर
5th 8th Students Exam : आता पाचवी, आठवीला नापास तर नापासच !
सुप्रिया सुळे अजूनही बचावात्मक पवित्र्यातच : कार्यकर्ते पडले बुचकळ्यात
Latest Marathi News मावडी कडेपठार येथे अफूची शेती : दोघांवर पोलिसांची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.