चाहुल उन्हाळ्याची : माघातच पेटला वैशाख वणवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कोरेगाव पार्क भागाचा पारा गुरुवारी 39 अंशांवर गेला. माघ महिन्यातच वैशाख वणवा पेटल्याने अंगाची लाही- लाही करणारे ऊन शहरात गुरुवारी जाणवत होते. कोरेगाव पार्कचे तापमान केवळ राज्यात नव्हे, तर देशात सर्वोच्च ठरले. दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत रस्त्यावरून जाताना अंग भाजून निघत होते. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल … The post चाहुल उन्हाळ्याची : माघातच पेटला वैशाख वणवा appeared first on पुढारी.

चाहुल उन्हाळ्याची : माघातच पेटला वैशाख वणवा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील कोरेगाव पार्क भागाचा पारा गुरुवारी 39 अंशांवर गेला. माघ महिन्यातच वैशाख वणवा पेटल्याने अंगाची लाही- लाही करणारे ऊन शहरात गुरुवारी जाणवत होते. कोरेगाव पार्कचे तापमान केवळ राज्यात नव्हे, तर देशात सर्वोच्च ठरले. दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत रस्त्यावरून जाताना अंग भाजून निघत होते. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानाचा पारा 36 ते 37 अंशांवर, तर किमान तापमान 18 ते 22 अंशांवर गेले आहे. बुधवारी शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 37 अंशांवर गेला होता, तर गुरुवारी त्यात 2 अंशांनी वाढ होऊन तो थेट 39 अंशांवर गेल्याने देशात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. मागच्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजीच शहराचा पारा 40 अंशांवर गेला होता. यंदा 29 फेब्रुवारी रोजी तो 39 अंशांवर गेला.
गुरुवारचे शहराचे कमाल व किमान तापमान…
कोरेगाव पार्क 39 (22.4), पुणे 36 (18.4), पाषाण 36( 18.9), लोहगाव 36 (20.9), चिंचवड 37(22.9), लवळे 38 (24.3), मगरपट्टा 36 ( 24), एनडीए 36 (17.5)
ऐन उन्हाळ्यात बरसणार पाऊस
शहराचे तापमान चाळीसच्या उंबरठ्यावर आलेले असताना गुरुवारी काश्मिरात हिमवर्षाव सुरू झाल्याने उत्तर भारताकडून शहरात शीतलहरी येत आहेत. तर बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त ढग आल्याने गुरुवारी दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. उष्ण आणि थंड वार्‍यांची महाराष्ट्रावर टक्कर होणार आहे. त्यामुळे शहरात शुक्रवार-शनिवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी वर्तवला आहे.
कोरेगाव पार्कचा पारा 39 अंशांवर
शहरातील तापमानाचा पारा वाढत असताना गुरुवारी दुपारीच ढग दाटून आले. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे तर उत्तर भारतातून शीत लहरी शहरावर येत आहेत. या दोन्ही वार्‍यांची टक्कर होणार असल्याने विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. शहरात दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी मात्र पावसाचा
अंदाज आहे. गुरुवारी रात्री 8 वाजता तापमानाचे नवे अपडेट आले तेव्हा पुणे शहराची संपूर्ण देशात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 39, लवळे 38 तर शिवाजीनगरचा पारा 36 अंशांवर गेला.
राज्यातील गुरुवारचे कमाल तापमान
पुणे (कोरेगाव पार्क 39, शिवाजीनगर 36), मुंबई 32, नागपूर 36, छत्रपती संभाजीनगर 34.3, कोल्हापूर 35.4, नाशिक 35.4, सोलापूर 37.6,रत्नागिरी 35.3, सातारा 35.2, सांगली 36.2, मालेगाव 35.6, जळगाव 35.4, परभणी 34.9
हेही वाचा

Lok Sabha elections 2024 | भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज, मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक
मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची धावाधाव : हॉस्पिटल, वसतिगृह वेगवेगळ्या ठिकाणी
Lal Vadal : मुक्काम वाढला, रात्री उशिरापर्यंत बैठकीत खल

Latest Marathi News चाहुल उन्हाळ्याची : माघातच पेटला वैशाख वणवा Brought to You By : Bharat Live News Media.