घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
शहर व नाशिक ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा (Interstate Burglary Gang) छडा ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. या टोळीतील १० संशयितांना पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडून घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस झाले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात २४ फेब्रुवारीला चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझात घरफोडी केली होती. चोरट्यांनी हॉटेलमधील रोकड व मद्यसाठा असा एकूण दाेन लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) समांतर तपास केला. गत दोन महिन्यांत इगतपुरी, घोटी परिसरात चोरट्यांनी हॉटेल्स, वाइन शाॅपमध्ये घरफोडी करून मद्यचोरी केल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या घरफोड्या एकच टोळी (Interstate Burglary Gang) करत असल्याचा संशय बळावला. त्यानुसार छडा लावत पथकाने संशयितांची धरपकड केली. त्यात केरळ, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांसह जिल्ह्यातील मालेगाव शहरातील चोरट्यांचा समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने, मोबाइल, चोरलेला मद्यसाठा, नवीन खरेदी केलेली दुचाकी असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्य सूत्रधारावर पाळत
शहरात घरफोडी करणारा सराईत हसन हमजा कुट्टी (४५, रा. पेठ रोड, नाशिक, मूळ रा. केरळ) याच्यावर पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेवून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने टोळीसमवेत शहरासह जिल्ह्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी एकूण दहा संशयितांना पकडले आहे. टोळीचा म्होरक्या हसन कुट्टी याच्याविरोधात घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल असून, त्यातील सात गुन्ह्यांमध्ये त्यास शिक्षा झाली आहे.
जामिनावरच सुटताच कारनामे
टोळीतील संशयित शेख तौफिक शेख सुलेमान ऊर्फ पापा फिटिंग हा मालेगावमधील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात खून, दरोडा, जबरी चोरीसारखे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच सर्व संशयितांविरेाधात दरोडा तयारी, घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांना मध्यवर्ती कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी टोळी करून घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. (Interstate Burglary Gang)
अटक संशयितांची नावे
हसन हमजा कुट्टी (४५), दिलीप रूमालसिंग जाधव (२३), अनिल छत्लरसिंग डावर (२६, दोघे रा. फुलेनगर, नाशिक, मूळ रा. मध्य प्रदेश), मुस्तफा अब्दुल अन्सारी (२५, रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव, मूळ रा. झारखंड), सय्यद इस्माईल सय्यद जदूर (४२), सईद शेख मजिद ऊर्फ सईद बुड्या (३४), मोहम्मद अस्लम अब्दुल सत्तार (३८), सय्यद निजाम सय्यद अन्वर (४०), हनिफ खान इकबाल खान (३२), शेख तोफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटिंग, (२६, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक).
हेही वाचा:
आमच्या सहनशक्तीशी खेळू नका : पोलिस आयुक्तांनी तिखट शब्दांत सुनावले
..तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश करू : आढळराव पाटील
Lal Vadal : मुक्काम वाढला, रात्री उशिरापर्यंत बैठकीत खल
Latest Marathi News घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत Brought to You By : Bharat Live News Media.