DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड, काय कारण?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियावर कडक कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर एका ८० वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्ध प्रवाशाला विमानातून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले. त्यामुळे प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. (Air India Fined) या प्रकरणी … The post DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड, काय कारण? appeared first on पुढारी.

DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड, काय कारण?

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियावर कडक कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर एका ८० वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्ध प्रवाशाला विमानातून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले. त्यामुळे प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. (Air India Fined)
या प्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला नोटीसही पाठवली होती आणि संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, नियामकाने सर्व विमान कंपन्यांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत की, “ज्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान विमानात चढताना किंवा उतरताना मदतीची आवश्यकता असेल, त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हीलचेअर उपलब्ध करण्यात यावे”. (Air India Fined)
Air India Fined : वृद्धाचा मृत्यू 16 फेब्रुवारीलाच
ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घडली. तातडीने कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि ७ दिवसांत उत्तर मागितले होते. प्रतिसादाचे पुनरावलोकन केल्यानंतर, विमान वाहतूक नियामकाने एअर इंडियाला दोषी ठरवले. विमान कंपनीने डीजीसीएला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, प्रवाशाच्या पत्नीला व्हीलचेअर देण्यात आली होती. वृद्ध पुरुष प्रवाशाला थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले. वाट पाहण्याऐवजी त्याने पत्नीसह पायीच टर्मिनलवर जाणे पसंत केले.
विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही
“एअर इंडियाने चुकलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एअरलाइनने केलेल्या कोणत्याही कारवाईची माहिती दिलेली नाही आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एअरलाइनने कोणत्याही सुधारात्मक कारवाईची माहिती दिली नाही,” असे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. कारवाई दाखवण्यातही ते अयशस्वी झाले.
हेही वाचा:

दुबईला जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानात तांत्रिक बिघाड; प्रवासी सुरक्षित
Air India : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा ‘लघुशंकेचे’ प्रकरण; उपद्रवी प्रवाशाला अटक
एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार

Latest Marathi News DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड, काय कारण? Brought to You By : Bharat Live News Media.