डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत नाशिक मध्य मतदारसंघातील भाजप आमदार. प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योगमंत्री उदय सांमत यांची भेट घेतल्यानंतर अखेर नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारणीतील अडचणी दूर झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रकल्पाची घोषणा केली जाणार असून, स्काय बसचा प्रकल्पही राबविला जाणार असल्याचे आश्वासन सामंत … The post डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती appeared first on पुढारी.

डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
दैनिक ‘Bharat Live News Media’च्या वृत्ताची दखल घेत नाशिक मध्य मतदारसंघातील भाजप आमदार. प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योगमंत्री उदय सांमत यांची भेट घेतल्यानंतर अखेर नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारणीतील अडचणी दूर झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रकल्पाची घोषणा केली जाणार असून, स्काय बसचा प्रकल्पही राबविला जाणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली आहे.
नाशिकमद्ये डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारण्याची घोषणा तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली होती. त्यामुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या असताना विद्यमान उद्योगमंत्री सामंत यांनी तीन दिवसांपूर्वी पुणे, रत्नागिरी, शिर्डी आणि नागपूर या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर हब उभारण्याची नवी घोषणा केली. यामुळे नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर उभारण्याची डॉ. भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी केलेली घोषणा हवेत विरल्याचे वास्तव मांडत दैनिक ‘Bharat Live News Media’ने उद्योजकांमधील नाराजी दि.२६ रोजीच्या अंकात मांडली होती. या वृत्ताची आ. फरांदे यांनी दखल घेत सामंत (Industries Minister Uday Samant) यांची भेट घेतली. एम. एस. एम. ई डिफेन्स एक्स्पो (MSME Defense Expo), पुणे येथील उद्घाटन कार्यक्रमात उद्योगमंत्री सामंत यांनी पुणे, रत्नागिरी, शिर्डी व नागपूर येथे संरक्षण साहित्य उत्पादन हब डिफेन्स क्लस्टरची घोषणा केली. त्यामुळे नाशिकवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. आमदार फरांदे यांनी सदर बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीदेखील चर्चा केली. यानंतर नाशिक येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) तयार करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.

नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हबच्या (Defense Innovation Hub) उभारणीतील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भातील घोषणा केली जाणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. – प्रा. देवयानी फरांदे, आमदार, भाजप.

हेही वाचा :

Bharat Live News Media विशेष : उद्योगमंत्र्यांच्या नव्या घोषणेने संभ्रम : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, उद्योजकांचा सूर
Bharat Live News Media इफेक्ट : डिफेन्स क्लस्टरमध्ये नाशिकचा समावेश व्हावा
दै. Bharat Live News Mediaच्या पाठपुराव्याला यश : डिफेन्स क्लस्टर हब उभारणीतील अडचणी दूर

Latest Marathi News डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती Brought to You By : Bharat Live News Media.