मार्चचे स्वागत पावसाने; तीन दिवस राज्यात हलक्या सरींचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने राज्यातील बहुतांश भागात 1 ते 3 मार्चपर्यंत हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ईशान्य इराण येथून पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रीय झाल्याने मार्चच्या पहिल्या तीन दिवसांत भारताच्या हवामानात मोठे बदल … The post मार्चचे स्वागत पावसाने; तीन दिवस राज्यात हलक्या सरींचा अंदाज appeared first on पुढारी.

मार्चचे स्वागत पावसाने; तीन दिवस राज्यात हलक्या सरींचा अंदाज

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने राज्यातील बहुतांश भागात 1 ते 3 मार्चपर्यंत हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ईशान्य इराण येथून पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रीय झाल्याने मार्चच्या पहिल्या तीन दिवसांत भारताच्या हवामानात मोठे बदल दिसणार आहेत. हिमालयात बर्फवृष्टीसह पाऊस होईल, तसेच अरबी समुद्रापासून वायव्य भारतापर्यंत बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने वातावरणात मोठी आर्द्रता राहील. त्यामुळे देशातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहून विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
राज्यात वार्‍याचा वेग वाढणार
जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट, बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद येथे 1 ते 3 मार्च या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग ताशी 50 ते 60 इतका वाढणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागात 1 ते 3 मार्च या कालावधीत हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
राज्याचे गुरुवारचे किमान तापमान
नाशिक 17.1,पुणे 18.1,अहमदनगर 18.4, जळगाव 18.7, कोल्हापूर 22.9, महाबळेश्वर 17.6, नाशिक 17.4, सांगली 22.1, सातारा 21.5, सोलापूर 22.8, धाराशिव 23, छत्रपती संभाजीनगर 19.7, परभणी 21, नांदेड 22.4, बीड 22.2, अकोला 20.6, अमरावती 19.3, चंद्रपूर 18.2, गोंदिया 18.4, नागपूर 19.8
असा आहे पावसाचा अंदाज…

 मध्य महाराष्ट्र : 1 व 2 मार्च प मराठवाडा : 1 ते 3 मार्च प विदर्भ : 1 ते 3

हेही वाचा

मुख्यमंत्री शिंदेसह दोन उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारकडून जेवणाचे निमंत्रण
Dhairyasheel Mane : टेंडर प्रक्रिया होईपर्यंत गप्प का बसला? : खा. धैर्यशील माने
Lok Sabha Election Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध मंडलिक

Latest Marathi News मार्चचे स्वागत पावसाने; तीन दिवस राज्यात हलक्या सरींचा अंदाज Brought to You By : Bharat Live News Media.