आजपासून दहावीची परीक्षा
पुणे, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, अमरावती व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकूण पाच हजार 86 मुख्य केंद्रांवर दहावीच्या परीक्षा (SSC Exam) होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा कोणताही ताण येऊ नये, याकरिता प्रत्येक केंद्रावर दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षीचे दहावीच्या लेखी परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी राज्यात दहावी परीक्षेसाठी एकूण 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंद केली असून, परीक्षेसाठी राज्यातील एकूण 23 हजार 272 शाळांतील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मागील वर्षी या परीक्षेकरिता राज्यातून एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. (SSC Exam)
Latest Marathi News आजपासून दहावीची परीक्षा Brought to You By : Bharat Live News Media.