खानापूर : नागेवाडी ग्रामपंचायतीत भर मासिक सभेत कर्मचाऱ्याने ग्रामसेवकाला बडवले
विटा; Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्ष झाल तरी पगाराची बिले देत नाही आणि लोकांच्या तक्रारीवरून आमच्या विरोधात भूमिका घेतो म्हणून भर मासिक सभेत कर्मचाऱ्याने ग्रामसेवकालाच बडवल्याची घटना घडली. ही घटना आज (दि. २९) दुपारी एक वाजताच्या सुमारास खानापूर तालुक्यातील नागेवाडी ग्रामपंचायतीत घडली. या प्रकरणी विटा पोलिसात संबंधित कर्मचारी विजय साहेबराव निकम (रा. नागेवाडी) याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित ग्रामसेवक महादेव संभाजी इंगवले यांनी फिर्याद दिली आहे.
खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे ग्रामपंचा यतमध्ये आज गुरुवारी दुपारी एक वाजता मासिक सभा सुरू होती. या सभेमध्ये ग्रामपंचा यतीचे कर्मचाऱ्यांचे पगारामध्ये महागाई भत्ता फरक वाढ करण्याबाबतचा विषय चालू अस ताना कर्मचारी काम करत नाहीत, आदेश ऐकत नाहीत, फोन उचलत नाहीत याबाबतच्या तक्रारी काही सदस्यांकडून करण्यात आल्या. त्यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी ग्रामसेवक महादेव इंगवले हे पाणी पिण्यासाठी बाहेर गेले असता ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा कर्मचारी विजय निकम याने मागून तावातावाने रागात जाऊन ग्रामसेवक महादेव इंगवले यांना आमच्या विरोधी भूमिका मासिक सभेत घेता आणि आम्हाला आमच्या पगाराची बिले वर्ष- वर्ष देत नाही, नुसते राबवून घेता असे म्हणत त्यांची कॉलरची गच्ची पकडली आणि ओढत नेत शिवीगाळ करत मारहाण केली.शिवाय तुला बघुन घेतो अशी धमकीही दिली आहे. तसेच ग्रामसेवक इंगवले यांच्या शासकीय कामामध्ये अडथळा आणून कामकाज बंद पाडले. असे ग्रामसेवक इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून विजय निकम यांना अटक करण्यात आले आहे.निकम याच्यावर भारतीय दंड विधान संविधान कलम 353,332,504,506 प्रमाणे विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Latest Marathi News खानापूर : नागेवाडी ग्रामपंचायतीत भर मासिक सभेत कर्मचाऱ्याने ग्रामसेवकाला बडवले Brought to You By : Bharat Live News Media.