स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- पाथर्डी गाव सर्कल येथे गुरुवारी दुपारी स्कूल बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात चार शालेय विद्यार्थी आणि दोन्ही वाहनचालकही जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाथर्डी गावावरून वडनेरच्या दिशेने स्कूलबस (एमएच १५ ईएफ ०६११) जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या कार (एमएच १५ जेएम १३६३)शी समोरासमोर धडक झाली. बसमधील सहापैकी चार विद्यार्थी व दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहरा, डोक्यास दुखापत झाली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताने मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली. विद्यार्थ्यांना धीर देत त्यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी तसेच मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
Latest Marathi News स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.