महासंस्कृतीच्या मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर

जळगाव पुढारी वृत्तसेवा- जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस स्थानिक कलाकारांच्या किंकरी या वाद्या पासून ते शिवकालीन मर्दानी खेळ सादर करून गाजवला. तर कोळी गीताने मोठी रंगत आणली. ब्रिटिशांच्या विरोधात देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या गावापर्यंत लढे लढले गेले. खानदेशातील लढवय्यांनी ह्या ब्रिटिश विरोधातील लढ्यात कशी कामगिरी केली हे किंकरी हे तंतूताल वाद्य वाजवून … The post महासंस्कृतीच्या मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर appeared first on पुढारी.

महासंस्कृतीच्या मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा- जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस स्थानिक कलाकारांच्या किंकरी या वाद्या पासून ते शिवकालीन मर्दानी खेळ सादर करून गाजवला. तर कोळी गीताने मोठी रंगत आणली.
ब्रिटिशांच्या विरोधात देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या गावापर्यंत लढे लढले गेले. खानदेशातील लढवय्यांनी ह्या ब्रिटिश विरोधातील लढ्यात कशी कामगिरी केली हे किंकरी हे तंतूताल वाद्य वाजवून हे शौर्य सांगितले. गोंडगाव ता. भडगाव येथील भिका काशिनाथ भराडी आणि त्यांच्या साथीदारांनी ही कला सादर केली.
शिवकालीन मर्दानी खेळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे जे मर्दानी खेळ करायचे त्यात काठी चालवणे… ते अगदी हातावरचे नारळही अलगद वरच्या वर फोडणे… हे खेळ रावेरचे युवराज माळी आणि त्यांचा चमू यांनी सादर केला. यातल्या हा खेळ सादर करणाऱ्या सर्व मुली होत्या हे अधिक कौतुकास्पद, त्यातली अवघ्या तीन वर्षाची सुशी माळी यांनी अंगावर रोमांच उभी करणारी काठी चालवली.
पारंपारिक लोक कला आणि नृत्य
पारंपारिक लोक कलेत जोगवा, धनगरी नृत्य सादर केले. हे सर्व बाल कलाकार पारंपारिक वेषात आलेले होते. खंडोबा देवाच्या लग्नाचे अत्यंत तालबद्द नृत्य करून ह्या युवा कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे हा या महासंस्कृती महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. हे स्थानिक कलाकरातून या संधी मधून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील कलाकार निर्माण व्हावेत हाच हेतू राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा आहे.
हेही वाचा :

Dhule News : परिसंवाद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बहुभाषिक कवी संमेलनाने ग्रंथोत्सवाचा समारोप
Nashik News : ब्रेकअप केल्याचा राग आला, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न

Latest Marathi News महासंस्कृतीच्या मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर Brought to You By : Bharat Live News Media.