प्रवाशाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले, कारण धक्कादायक

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मोबाइल चोर असल्याच्या संशयावरून सहप्रवाशाला मारहाण करून धावत्या रेल्वेगाडीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रोहितकुमार मुकेश गोस्वामी (२५) या युवकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयकुमार साहू (२९, रा.चेनपुरा, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१५  फेब्रुवारीच्या मध्यरात्री … The post प्रवाशाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले, कारण धक्कादायक appeared first on पुढारी.

प्रवाशाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले, कारण धक्कादायक

मनमाड (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- मोबाइल चोर असल्याच्या संशयावरून सहप्रवाशाला मारहाण करून धावत्या रेल्वेगाडीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रोहितकुमार मुकेश गोस्वामी (२५) या युवकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजयकुमार साहू (२९, रा.चेनपुरा, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१५  फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० च्या दरम्यान मनमाड रेल्वे स्टेशन येथे पंजाब मेल उभी असताना त्यांच्या समोर मोबाइल चाेरीच्या संशयावरून रोहितकुमार मुकेश गोस्वामी (रा. रामनगर, शिवपुरी, मध्य प्रदेश) यास एका व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतरांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने इतरांनाही धमकावले. रोहितने त्याच्या वडिलांना फोन केला असता त्यांनाही मुलाला रेल्वेतून खाली फेकून देण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, रेल्वे धावू लागली. तसे त्या व्यक्तीने रोहितला घेऊन जात नंतर रेल्वेतून बाहेर फेकून दिले.
दरम्यान, कुटुंबीयांनी शोध तपास घेताना ते मनमाडला आले. तेव्हा मृतदेहाची ओळख पटली. सहायक पोलिस निरीक्षक डी. लांडगे हे तपास करीत आहे.

रोहित १४ तारखेला मुंबईहून गावी जाण्यासाठी निघाला होता. रात्री १२.४३ ला त्याने फोनवरून ‘मला काही लोक मारत असून, तुला पुढील स्टेशनवर उतरून घेऊ’ असे सांगत होता. ती गाडी झाशीला २.३० वाजता पोहोचली. मात्र रोहितचा तपास नव्हता. आम्ही १६ तारखेला जोगेश्वरी येथे तक्रार दिली. मनमाड पोलिसांत तपास केला असता त्याचा मृतदेह हाती आला. रोहितचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला एक साडेतीन वर्षांची मुलगी आहे. – मोहनप्रसाद गोस्वामी, मृताचे काका

हेही वाचा :

GDP : अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के
Mental Health | आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे?
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चिन्ह ‘मशाल’च?

Latest Marathi News प्रवाशाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले, कारण धक्कादायक Brought to You By : Bharat Live News Media.