बीड : परळी नगर परिषदेमध्ये चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ
परळी वैजनाथ; Bharat Live News Media वृत्तसेवा : परळी नगर परिषदेच्या कार्यालयात घुसून नगरपरिषदेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आज (दि. २९) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने नगर परिषदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संभाजीनगर व शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परळी नगर परिषदेत गुरूवारी (दि. २९) पहाटे अज्ञात तीन अज्ञातांनी पाठीमागील दरवाजाने कार्यालयात घुसून काही कपाटांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. या चोरट्यांना शोध घेण्याचे मोठे आव्हान असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परळी शहर व परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही पोलीस ठाण्याच्या बाजूस असलेल्या परळी नगर परिषदेत आज (दि. 29) पहाटे 3 वाजून 22 मिनीटांनी तीन अज्ञात चोरटे तोंडाला मास्क बांधूननगर परिषदेच्या कार्यालयात पाठीमागील दरवाजाने आत घुसले. त्यांनी कार्यालयातील काही कपाटांची कुलूपे तोडली मात्र कुठलीही फाईल अथवा रोकड नेली नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पहाटे अज्ञात चोरटे कार्यालयात घुसले ही बाब खरी आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे ते म्हणाले.
Latest Marathi News बीड : परळी नगर परिषदेमध्ये चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.