उपमुख्यमंत्री फडणवीस धमकी प्रकरण; योगेश सावंतला १४ दिवसांची कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकीची पोस्ट शेअर केली. याप्रकरणी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या योगेश सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Politics In Maharashtra) महाराष्ट्रात जातीयवाद पसरवल्याचा आरोप भाजपने केला आहे. या … The post उपमुख्यमंत्री फडणवीस धमकी प्रकरण; योगेश सावंतला १४ दिवसांची कोठडी appeared first on पुढारी.

उपमुख्यमंत्री फडणवीस धमकी प्रकरण; योगेश सावंतला १४ दिवसांची कोठडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकीची पोस्ट शेअर केली. याप्रकरणी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या योगेश सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Politics In Maharashtra)
महाराष्ट्रात जातीयवाद पसरवल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी योगेश याच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. त्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 153(A), 500, 505(3), 506(2), आणि 34 अन्वये गुन्‍हा नोंदवला आहे. दरम्यान आज न्यायालयात त्याला हजर केले असता, १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Politics In Maharashtra)
“या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो..” महाविकास आघाडीचे ट्विट चर्चेत
दरम्यान महाविकास आघाडीच्या अधिकृत ‘X’ खात्यावर शेअर केलेल्य़ा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” एका ट्यूब चॅनलने व्हिडीओद्वारे मराठा आंदोलक तरुणाची घेतलेली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केली, जे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. योगेशला अटक करून सरकारने चालवलेल्या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो. योगेश, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. (Politics In Maharashtra)
“लढेंगे और जितेंगे…”: विकास लवांडे (राष्ट्रवादी शरद पवार गट प्रवक्ते)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “घाबरलेल्या राज्य सरकारचा तीव्र निषेध ! तुमच्या हुकूमशाहीला आम्ही विरोध करत राहणार लढेंगे और जितेंगे…
हेही वाचा:

Union Cabinet Metting: भारतात बनणार सेमीकंडक्टर निर्मितीचे हब; केंद्राची ३ प्रकल्पांना मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चिन्ह ‘मशाल’च?
Mental Health | आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News उपमुख्यमंत्री फडणवीस धमकी प्रकरण; योगेश सावंतला १४ दिवसांची कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.