अमरावती : अस्थि विसर्जन करून परत येणाऱ्या पिकअप वाहनाचा शेंदुर्जना घाट पुलावर अपघात, १४ जण गंभीर
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथून अस्थी विसर्जन करून परत येत असताना पिकअप वाहनाला झालेल्या अपघातात 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 29) तिवसा ते कुऱ्हा मार्गावर शेंदुर्जना घाट पुलावजवळ दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान झाला.
प्राप्त माहितीनुसार पिकअप वाहन क्रमांक एम एच 27 बी एक्स 86 74 ने चांदूरबाजार तालुक्यातील अंतोरा गावातील नागरिक आज सकाळी राख शिरविण्यासाठी आले होते. तेथून परत येत असताना तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकअप वाहन पलटी झाले. या वाहनांमध्ये एकूण 20 जण प्रवास करत होते. त्यापैकी 14 गंभीर जखमी आहेत. यामध्ये तीन लहान बालकांचा देखील समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.
Latest Marathi News अमरावती : अस्थि विसर्जन करून परत येणाऱ्या पिकअप वाहनाचा शेंदुर्जना घाट पुलावर अपघात, १४ जण गंभीर Brought to You By : Bharat Live News Media.