सेन्सेक्स ७२,५०० वर बंद, ‘हे’ शेअर्स तेजीत, मार्केटमध्ये आज काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स १९५ अंकांनी वाढून ७२,५०० वर बंद झाला. तर निफ्टी ३१ अंकांच्या वाढीसह २१,९८२ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर हेल्थकेअर वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. बँक, कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर ०.५-१ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक … The post सेन्सेक्स ७२,५०० वर बंद, ‘हे’ शेअर्स तेजीत, मार्केटमध्ये आज काय घडलं? appeared first on पुढारी.
सेन्सेक्स ७२,५०० वर बंद, ‘हे’ शेअर्स तेजीत, मार्केटमध्ये आज काय घडलं?


Bharat Live News Media ऑनलाईन : शेअर बाजारात आज गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स १९५ अंकांनी वाढून ७२,५०० वर बंद झाला. तर निफ्टी ३१ अंकांच्या वाढीसह २१,९८२ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर हेल्थकेअर वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. बँक, कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर ०.५-१ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला. ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. तर आयटी क्षेत्रातील काही प्रमाणातील विक्रीचा दबाव राहिला. (Closing Bell)
टॉप गेनर्स, टॉप लूजर्स
सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, एम अँड एम, मारुती, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन हे शेअर्स वाढले. तर टीसीएस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेस, टाटा कन्झ्यूमर, इंडसइंड बँक, ब्रिटानिया, अदानी पोर्ट्स हे टॉप गेनर्स राहिले. तर अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, LTIMindtree, आयशर मोटर्स, यूपीएल हे शेअर्स टॉप लूजर्स होते. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी ०.५० टक्क्यांनी वाढले.
जिओ फायनान्शियल शेअर्स तेजीत
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (जेएफएसएल) चे शेअर्स बीएसईवर आजच्या ट्रेडमध्ये ४.४ टक्क्यांनी वाढून ३२१ रुपयांवर गेला. त्यानंतर तो ३१४ रुपयांवर आला. गेल्या तीन महिन्यांत हा शेअर्स ४० टक्क्यांनी वाढला आहे. (Jio Financial Services (JFSL) shares)
पेटीएमची सलग तिसऱ्या सत्रात घसरण
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून ३८५.९० रुपयांच्या दिवसाच्या निचांकी पातळीवर आले. दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स बीएसईवर ४.५९ टक्के घसरणीसह ३८७.५० रुपयांवर होता. या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली आहे. (Shares of One 97 Communications)
हे ही वाचा :

बाजारात विक्रीचा मारा! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी उडाले
लाेकसभा- विधानसभा निवडणूक २०२९ मध्ये एकत्रित होण्याची शक्यता

 
The post सेन्सेक्स ७२,५०० वर बंद, ‘हे’ शेअर्स तेजीत, मार्केटमध्ये आज काय घडलं? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source