लखनौ सुपर जायंट्सने केली कर्णधार-उपकर्णधाराची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 LSG New Captain : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17वा हंगाम काही आठवड्यांत सुरू होणार आहे. बीसीसीआयने लीगच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील शानदार सामन्याने होणार आहे. सर्व संघ आगामी आयपीएल हंगामाच्या … The post लखनौ सुपर जायंट्सने केली कर्णधार-उपकर्णधाराची घोषणा appeared first on पुढारी.

लखनौ सुपर जायंट्सने केली कर्णधार-उपकर्णधाराची घोषणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 LSG New Captain : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17वा हंगाम काही आठवड्यांत सुरू होणार आहे. बीसीसीआयने लीगच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील शानदार सामन्याने होणार आहे. सर्व संघ आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, आता लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने आपल्या कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली आहे.

INDvsENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या ५व्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल! बीसीसीआयची घोषणा

निकोलस पुरन एलएसजीचा नवा उपकर्णधार
लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी (29 फेब्रुवारी) त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावरून एक पोस्ट शेअर करून संघाचा कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली. त्यांनी केएल राहुल आणि निकोलस पुरन यांचा फोटो शेअर केला आहे. दोघांनी धरलेल्या टी-शर्टवर निकोलस पुरनचे टोपणनाव निक्की पी असे लिहिलेले आहे. त्या खाली व्हिसी असे लिहिले आहे. त्याच वेळी, कॅप्शनमध्ये एलएसजीने स्पष्टपणे लिहिले आहे की, केएल राहुल हा कर्णधार आणि त्याचा उपकर्णधार निकोलस पुरन असेल. गेल्या हंगामादरम्यान एलएसजीचा उपकर्णधार क्रुणाल पंड्या होता, त्याने केएल राहुलच्या दुखापतीनंतर संघाने नेतृत्व केले होते. (IPL 2024 LSG New Captain)
लखनऊ सुपर जायंट्स संघाने 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये प्रवेश केला. या संघाने आतापर्यंत दोन हंगाम खेळले आहेत. दोन्ही स्पर्धेत संघ तिसरा क्रमांकावर राहिला आणि प्लेऑफसाठी पात्र ठरला. संघ एलिमिनेटर खेळला. मात्र, दोन्ही वेळा एलिमिनेटर सामन्यात एलएसजी संघाचा पराभव झाला. 2022 च्या मोसमात, एलएसजीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केले होते, तर 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत हा हंगाम एलएसजीसाठी खास असेल, कारण केएल राहुल संपूर्ण हंगाम खेळणार आहे. (IPL 2024 LSG New Captain)

KL Rahul (C)
Nicholas Pooran (VC)
This season feels special already 💙 pic.twitter.com/367JTTeSHL
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 29, 2024

Latest Marathi News लखनौ सुपर जायंट्सने केली कर्णधार-उपकर्णधाराची घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.