फडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक

 पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकीची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. योगेश सावंत असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असुन तो शऱद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम  153(A), 500, … The post फडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक appeared first on पुढारी.

फडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक

 Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकीची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. योगेश सावंत असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असुन तो शऱद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम  153(A), 500, 505(3), 506(2), आणि 34 अन्वये गुन्‍हा नोंदवला असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Maharashtra Politics)
मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो
दरम्यान महाविकास आघाडीच्या अधिकृत ‘X’ खात्यावर शेअर केलेल्य़ा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” एका ट्यूब चॅनलने व्हिडीओद्वारे मराठा आंदोलक तरुणाची घेतलेली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केली, जे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. योगेशला अटक करून सरकारने चालवलेल्या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो. योगेश, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “घाबरलेल्या राज्य सरकारचा तीव्र निषेध ! तुमच्या हुकूमशाहीला आम्ही विरोध करत राहणार लढेंगे और जितेंगे…

घाबरलेल्या राज्य सरकारचा तीव्र निषेध !@mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
तुमच्या हुकूमशाहीला आम्ही विरोध करत राहणार ….. लढेंगे और जितेंगे@NCPspeaks @yogi_9696 pic.twitter.com/4HLDpdfUIL
— Vikas Lawande (@VikasLawande1) February 29, 2024

Maharashtra Politics :  मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि..
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी ४२०, ४६५,४६८,४७१ आणि ४७३ नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.अधिकार्‍यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदनांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची सुमारे बारा निवेदने समोर आली आहेत.

एका ट्यूब चॅनलने व्हिडीओद्वारे मराठा आंदोलक तरुणाची घेतलेली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केली, जे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. योगेशला अटक करून सरकारने चालवलेल्या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध… pic.twitter.com/OPsCUXkvtF
— महाविकास आघाडी Official (@MahavikasAghad3) February 29, 2024

Mumbai Police registered an FIR under sections 153(A), 500, 505(3), 506(2), and 34 of the IPC against unknown persons for using derogatory language against Maharashtra Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis and threatening to kill him: Mumbai Police
— ANI (@ANI) February 29, 2024

एका ट्यूब चॅनलने व्हिडीओद्वारे मराठा आंदोलक तरुणाची घेतलेली प्रतिक्रिया आमचे सहकारी योगेश सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केली, जे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. योगेशला अटक करून सरकारने चालवलेल्या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो. योगेश, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.
— Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) February 29, 2024

हेही वाचा 

1993 Serial Bomb Blast Case | १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता
Maharashtra CMO | मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरले; गुन्हा दाखल
Kolhapur Politics | ए. वाय. समर्थक ‘के.पीं.’च्या संपर्कात? लवकरच प्रवेश

Latest Marathi News फडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.