थंड पाणी पिऊन बॉडीबिल्डरला जाव लागलं मृत्यूच्या उंबरठ्यावर, आता करतोय जनजागागृती
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पेशाने बॉडीबिल्डर असलेल्या व्यक्तीला थंड पाणी पिल्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर जावं लागलं होत. नुकतच त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरुकता निर्माण करत आहे. त्या बॉडीबिल्डरच नाव आहे फ्रँकलिन अर्बेना. तो अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील रहिवासी आहे. (Heart Surgery)
Heart Surgery : बॉडीबिल्डरने केली हृदय शस्त्रक्रिया
अमेरिका या देशातील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन या शहरामधील एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर फ्रँकलिन अर्बेना लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरुकता निर्माण करत आहे. जनजागृती करत असताना तो आपल्या १५ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे फिटनेस जपत असताना झालेल्या चुकांबद्दल माहिती सांगण्याच काम करत आहे. फ्रँकलिन सांगताो की एकदा वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिल्याने त्याचा जीव जाता-जाता वाचला. मृत्यूच्या दाढेतुन तो वैद्यकीय उपचाराने परत आला. फिटनेसबद्दल तो लोकांना सतत सावध करत असतो.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
माहितीनुसार, गेल्या १५ वर्षांत, फ्रँकलिनला वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागले आहे. या दरम्यान तो २० पेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये गेला आहे. फ्रँकलिन १८ वर्षांचा असताना अचानक बेशुद्ध पडला. त्याच्यानंतर त्याला त्याच्या आरोग्याची परिस्थिती समजली. त्याच्या वैद्यकीय तपासणीने मूल्यांकन केले. तेव्हा लक्षात आले की त्याला हृदयाच्या शस्त्रक्रियेची गरज भासत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फ्रँकलिन एरिबियाना म्हणाला की, ” मी थंड पाणी पीत असताना माझ्या छातीत लक्षणीय अशी धडधड जाणवली. मी यापूर्वी असे कधीही अनुभवले नव्हते. यानंतर फ्रँकलिन अचानक बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
प्रकृती का बिघडली?
जेव्हा फ्रँकलिनने थंड पाणी प्याले, तेव्हा त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हॅगस मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे ही स्थिती उद्भवली. व्हॅगस मज्जातंतू प्रत्यक्षात मेंदूपासून छातीपर्यंत पसरते आणि ती सहसा हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे काम करते. फ्रँकलिनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, अशा स्थितीत लोकांना सामान्यतः थकवा, छातीत अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात की व्यायाम करताना लोकांनी त्यांच्या लक्षणांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दुसरीकडे, या अवस्थेचा सामना करणारे फ्रँकलिनही लोकांमध्ये याबाबत जनजागृती करत आहेत.
Young people need accurate information about relationships, sexual health, and their bodies.
This is especially important in today’s highly connected world, where they are often exposed to misleading or harmful content online https://t.co/U4poRLE72n
— World Health Organization (WHO) (@WHO) February 28, 2024
हेही वाचा
कचरा जाळल्याने आरोग्य धोक्यात !
उडदाची डाळ आरोग्यासाठी बहुपयोगी
शिक्षण : चिंता शैक्षणिक आरोग्याची
Health Diary: नव्या वर्षाचा संकल्प करूया, निरोगी आरोग्यासाठी ‘आरोग्य डायरी’ बनवूया
Latest Marathi News थंड पाणी पिऊन बॉडीबिल्डरला जाव लागलं मृत्यूच्या उंबरठ्यावर, आता करतोय जनजागागृती Brought to You By : Bharat Live News Media.