एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार! पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी

पुढारी ऑनलाईन : एक कोटी कुटुंबांना रूफटॉप सोलर बसवण्यासाठी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला आज गुरूवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेवर ७५,०२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. “आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने’ला आज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना ३०० … The post एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार! पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी appeared first on पुढारी.

एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार! पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी

Bharat Live News Media ऑनलाईन : एक कोटी कुटुंबांना रूफटॉप सोलर बसवण्यासाठी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला आज गुरूवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेवर ७५,०२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. “आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने’ला आज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे…” अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)
पीएम मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना लाॅंच केली होती. या योजनेतर्गंत १ किलोवॅट प्रणालीसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅट प्रणालीसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट अथवा त्याहून अधिक प्रणालीसाठी ७८ हजार रुपये केंद्रीय अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. प्रत्येक कुटुंबीय राष्ट्रीय पोर्टलद्वारे अनुदानासाठी अर्ज करू शकतात आणि रूफटॉप सोलर बसवण्यासाठी योग्य विक्रेता निवडू शकतात.
तसेच मंत्रिमंडळाने खरीप हंगाम २०२४ साठी (१ एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदानित दरांना मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत ३ नवीन खतांच्या ग्रेडचा समावेश असेल. NBS आधारित पोषक तत्वांवर २४,४२० कोटी रुपयांची सबसिडी सरकार देईल,” असेही ठाकूर यांनी सांगितले. (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

#WATCH | Union Minister Anurag Thakur says, “Today cabinet meeting was held under the leadership of PM Modi. ‘PM Surya Ghar Muft Bijli Yojana’ has been approved today, one crore families will get 300 units of free electricity under this scheme…” pic.twitter.com/vWWHHYUK1u
— ANI (@ANI) February 29, 2024

हे ही वाचा ;

काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप खपवून घेणार नाही, UN मध्ये भारताने पाक आणि तुर्कीला फटकारले
माेठी बातमी : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र

Latest Marathi News एक कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार! पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी Brought to You By : Bharat Live News Media.