उद्योगमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्तावास परवानगी द्यावी : आ. रोहित पवारांचे पत्र

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत एमआयडीसीची जागा आता पाटेगाव ऐवजी कोंभळी, थेरगाव परिसरात नियोजित केली आहे. या महत्वपूर्ण बैठकीसाठी आमदार रोहित पवार हे मतदार संघातील लोकप्रतिनिधी असतानाही त्यांना डावलले गेले. त्यामुळे याप्रकरणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक महामंडळाचे सीईओ बिपीन शर्मा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल … The post उद्योगमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्तावास परवानगी द्यावी : आ. रोहित पवारांचे पत्र appeared first on पुढारी.

उद्योगमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्तावास परवानगी द्यावी : आ. रोहित पवारांचे पत्र

कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : कर्जत एमआयडीसीची जागा आता पाटेगाव ऐवजी कोंभळी, थेरगाव परिसरात नियोजित केली आहे. या महत्वपूर्ण बैठकीसाठी आमदार रोहित पवार हे मतदार संघातील लोकप्रतिनिधी असतानाही त्यांना डावलले गेले. त्यामुळे याप्रकरणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक महामंडळाचे सीईओ बिपीन शर्मा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि.28) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले.
या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीबाबत विधिमंडळातील बैठक घेतली. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असताना मला बैठकीस निमंत्रित केले नाही. तशी सूचना दिली नाही. हा प्रकार निंदनीय आहे. मंत्र्यांसह अधिकार्‍यांनी माझ्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. हा सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे. हक्कभंग सूचना मांडण्याची परवानगी द्यावी व पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विधानसभेच्या विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी मागणी आमदार पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे केली. दरम्यान, अध्यक्षांच्या भुमिककडे आता लक्ष असणार आहे.
हेही वाचा

कर्जतची एमआयडीसी आता थेरगाव परिसरात!
नगर, शिर्डीत संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी : मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
खा. नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारचा नकार

Latest Marathi News उद्योगमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्तावास परवानगी द्यावी : आ. रोहित पवारांचे पत्र Brought to You By : Bharat Live News Media.