ठाणे : लग्नात कार दिली नाही म्हणून महिलेचा छळ
उल्हासनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा ; हुंड्यात कार दिली नाही म्हणून सासरच्यांकडून अमानुष छळ सुरू असल्याचा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. एवढंच नाही तर बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या मध्यस्थी भावाला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची घटना केली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मला जेलमध्ये टाकले तर कळेल, मराठा समाज काय असतो : जरांगेंचा इशारा
Nagar : दहा लाखांची लूट करणारे जेरबंद : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
मंगलाष्टकाऐवजी भटजी गातो रोमँटिक गाणी…
अंबरनाथमधील जावसई गाव येथे राहणारे करण वेद यांची बहीण ज्योती हिचा विवाह एक वर्षांपूर्वी कॅम्प 5 परिसरात राहणार्या ज्योती हीचा विवाह वाल्मिकी कुटुंबात झाला होता. लग्नावेळी ज्योती यांच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी लागणारे सर्व साहित्य भेट दिले, परंतु आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने कार देता आली नाही. त्याविषयी वारंवार ज्योती हीचा सासरच्यांकडून छळ केला जात होता, असा आरोप ज्योती हिने केला आहे.
तसेच ज्योतीला महिनाभरापूर्वी बाळ झाले आहे. बाळंतपणानंतर तिची योग्य ती काळजी सासरची मंडळी घेत नव्हती. उलट तिला मारहाण केले जात असल्याने तिने याबाबतची तक्रार वडील आणि भावांकडे केली होती. त्यामुळे ज्योती हिचा भाऊ करण बैद, वडील हे तिच्या सासरी ज्योतीला घेण्यासाठी दुपारच्या वेळी आले होते. त्यावेळी दीपेश वाल्मिकी आणि ज्योती यांच्यामध्ये वाद झाला. हा आवाज सोडवण्यासाठी करण हा मध्ये गेला असता त्याचा राग येऊन दीपेश वाल्मिकी, तरुण वाल्मिकी, वासू वाल्मिकी या तिघांनी संगणमत करून लाकडी दांडक्याने करण आणि त्याची बहीण ज्योती या दोघांना बेदम मारहाण केली.
डोक्यात लाकडी दांडक्याचा प्रहार झाल्याने जखमी झालेल्या करणला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हीललाईन पोलीस ठाण्यात दीपेश, तरुण आणि वासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वासुदेव वाल्मिकी यांनी ब्रिजेश बैद, करण बैद आणि रोहित बैद यांच्या विरोधात मारहाण केल्याची उलट तक्रार दाखल केली आहे.
Latest Marathi News ठाणे : लग्नात कार दिली नाही म्हणून महिलेचा छळ Brought to You By : Bharat Live News Media.