छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाबद्दल फडणवीसांच्या मनात द्वेष आहे. त्यांनी मला जेलमध्ये टाकले तर त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते… कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरे दिसते तसे सर्वत्र मराठेच – मराठे दिसतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या
Nagar : दहा लाखांची लूट करणारे जेरबंद : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
नगर, शिर्डीत संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी : मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
Prasad Jawade : प्रसाद जवादेने तब्बल २८ किलो वजन केलं कमी, तुम्हीही या टिप्स वापरु शकता
छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारने शिष्टमंडळ पाठवून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आज देऊ-उद्या देऊ अशी आश्वासने दिली. यात मंत्री, अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. या सर्वांविरुद्ध राज्यभर गुन्हे दाखल करू.
काय म्हणाले जरांगे…
माझ्यावर दबाव आणून महाराष्ट्र अशांत करू नका.
मी राजकीय टीका केलेली नाही. मी त्यांच्या नेत्याला बोललो तर मराठा समाजाच्या नेत्यांना राग येण्याचे कारण काय?
दहा टक्क्यांचे आरक्षण स्वीकारले, तर मी चांगला आणि नाही स्वीकारले तर याला गुंतवा, अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे माझा संयम सुटला.
राज्य सरकारकडून दडपशाही सुरू. मात्र, आंदोलकांनी शांततापूर्वक आंदोलन करावे.
Latest Marathi News ‘मला जेलमध्ये टाकले तर कळेल, मराठा समाज काय असतो’ Brought to You By : Bharat Live News Media.