परळीच्या जुन्या थर्मलची दुसरी चिमणीही जमीनदोस्त
परळी वैजनाथ, प्रा. रविंद्र जोशी : मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी (जि. बीड) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी आज (दि.२९) जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आती. आज सकाळी संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. १२० मीटर उंचीची असलेली ही चिमणी जमीनदोस्त झाली.
मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे १९७१ मध्ये सुरू झाले. धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आल्या. या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक, दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक तीन, चार व पाच हे संच आयुर्मान संपल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संचांच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्येच पूर्ण करण्यात आली आहे. आता संच क्रमांक चार मधील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत.
आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक चार ची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार ३१ फेब्रुवारी १९८७ मध्ये सुरू करण्यात आला होता. हा संच आता संपूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. २०१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने २०१५ पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर २०१९ पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील ३० मेगावॅटचे दोन संच स्क्रॅचमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार, पाच हे तीन संच २०१९ पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक चारची १८० मी. उंचीची चिमणी आज पाडण्यात आली. यावेळी विद्युत केंद्राच्या अधिकारी सुरक्षा विभागाचे कर्मचारी, कन्स्ट्रक्शन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :
आरक्षण मर्यादा वाढीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा : जरांगे-पाटील
हिंगोली : जलेश्वर तलावाच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी ४८ तासांची मुदत
मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवली तर स्वाभिमानीचा पाठींबा
Latest Marathi News परळीच्या जुन्या थर्मलची दुसरी चिमणीही जमीनदोस्त Brought to You By : Bharat Live News Media.