Maratha Reservation : कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू असून, त्यानुसार आतापर्यंत शहरासह जिल्ह्यातील तब्बल 23 लाख पाच हजार 57 कागदपत्रांपैकी एक लाख 34 हजार 744 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी हीींिीं:// र्िीपश. र्सेीं. ळप या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. 13 कागदपत्रांच्या आधारानुसार प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आणि अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक, प्रशासकीय तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत 23 लाख पाच हजार 57 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात एक लाख 34 हजार 744 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड केल्या जात आहेत. ज्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे आहे, त्यांनी संकेतस्थळावर जाऊन या नोंदी पाहाव्यात. या नोंदी पाहून त्यामध्ये साधर्म्य असल्यास त्याचा उपयोग प्रमाणपत्र मिळण्यासाठी करून घेता येणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
70 भाषा जाणकारांची मदत
पुण्यात कुणबी नोंदी तपासण्यासाठी मोडी अभ्यासकांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. पुणे पुराभिलेख सहायक संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवून मोडी लिपीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या 70 भाषा जाणकारांची यादी जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
हेही वाचा
Pune News : ‘प्रॅक्टिस प्रोफेसर’ची नियुक्ती करा : युजीसी अध्यक्ष
Sports News : महिलांच्या ‘राईझ अप’ क्रीडा स्पर्धेचा पुन्हा थरार
Nashik News : जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम
The post Maratha Reservation : कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू असून, त्यानुसार आतापर्यंत शहरासह जिल्ह्यातील तब्बल 23 लाख पाच हजार 57 कागदपत्रांपैकी एक लाख 34 हजार 744 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी हीींिीं:// र्िीपश. र्सेीं. ळप या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम …
The post Maratha Reservation : कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड appeared first on पुढारी.