नगर : दहा लाखांची लूट करणारे जेरबंद नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : तलवारीचा धाक दाखवत शेवगावच्या जिनींग मॅनेजरला लुटणार्या टोळीतील दोघांना एलसीबी पोलिसांनी अटक केली. तीन महिन्यापूर्वी घडलेला हा गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपये जप्त केले आहेत.
चेतन प्रमोद तुजारे आणि समाधान विठ्ठल तुजारे (दोघेही रा. वरुर, शेवगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांनी शेवगाव जिनींगचे मॅनेजर विठ्ठल सोनवणे यांना चाकुचा धाक दाखवत लुटले होते.
विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे 28 डिसेंबर 2023 रोजी 10 लाखाची रोकड घेवून जात होते. विना नंबरच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या मोटारसायकलला लाथा मारत खाली पाडले. तलवारीचा धाक दाखवत 10 लाखाची लूट करत पोबारा केला होता. गुन्हा दाखल होण्यापासून पोलिस तांत्रिक विश्लेषण करत होते. दरम्यान हा गुन्हा चेतन प्रमोद तुजारे (रा. वरूर, शेवगाव) याने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले.
एलसीबी व शेवगाव पोलिसांनी संयुक्तपणे वरूर येथे तुजारे याची माहिती काढली. तो घरात असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी करता त्याने समाधान तुजारे व अर्जुन तुजारे (दोघेही रा.वरुर) यांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी समाधान विठ्ठल तुजारे याला पकडले, मात्र तिसरा आरोपी अर्जुन ऊर्फ बाळु तुजारे हा पसार झाला. पकडलेल्या दोघांकडून मोटारसायकल व लुटलेली रक्कम असा 10 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा
नगर, शिर्डीत संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी : मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
खा. नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारचा नकार
Jalgaon Crime News | सहा वर्षापासून फरार आरोपी अखेर गजाआड
Latest Marathi News नगर : दहा लाखांची लूट करणारे जेरबंद नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.