ए. वाय. समर्थक ‘के.पीं.’च्या संपर्कात? लवकरच प्रवेश

राशिवडे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय जुळवाजुळवा, धक्कातंत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे भोगावती, बिद्री कारखाना परिसरातील बहुतांश खंदे समर्थक माजी आमदार के. पी. पाटील यांच्या संपर्कात आहेत. ही मंडळी लवकरच के. पी. गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेहुण्या-पाहुण्यांचा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता … The post ए. वाय. समर्थक ‘के.पीं.’च्या संपर्कात? लवकरच प्रवेश appeared first on पुढारी.
ए. वाय. समर्थक ‘के.पीं.’च्या संपर्कात? लवकरच प्रवेश

प्रवीण ढोणे

राशिवडे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय जुळवाजुळवा, धक्कातंत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे भोगावती, बिद्री कारखाना परिसरातील बहुतांश खंदे समर्थक माजी आमदार के. पी. पाटील यांच्या संपर्कात आहेत. ही मंडळी लवकरच के. पी. गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेहुण्या-पाहुण्यांचा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. (Kolhapur Politics)
राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांमधील राजकीय संघर्ष जिल्ह्यांने पाहिला आहे. या संघर्षाचा फटका के.पी. यांना विधानसभेवेळी बसला हे सर्वश्रूत आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीवेळी ए. वाय. पाटील यांनी के. पीं.चे. राजकीय विरोधक आमदार प्रकाश आबिटकर यांचेशी उघडपणे हातमिळवणी करुन धक्का दिला होता. परंतु या निवडणुकीमध्येही के. पी. यांनी धक्का देत मोठ्या मताधिक्याने बिद्रीची एकतर्फी सत्ता घेतली. यामध्ये राधानगरी तालुक्यातून ए. वाय. यांच्यासह विरोधी पॅनलला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. शिवाय ए. वाय. सुध्दा पिछाडीवर राहीले. याठिकाणी ए.वाय. यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर राजकारणात मत्सूद्दी असणाऱ्या के. पी. यांनी राजकीय जुळवाजुळवीस सुरुवात केली. राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीला मानणारे बहुतांश प्रमुख नेते, कार्यकर्ते के.पी. यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल. त्यादृष्टीने राजकीय हालचाली गतीमान झाल्या असुन बहुतांश प्रमुखांनी थेट के.पी. यांना सकारात्मक निर्णय दिल्याचे समजते. तसे झाले तर के.पी. यांचा मास्टरस्ट्रोक राजकीय दिशाच बदलून जाण्याची शक्यता आहे.
भोगावतीच्या स्वीकृत संचालकपदाची आशा?
काही ए. वाय. समर्थकांना भोगावतीच्या स्वीकृत संचालक पदाची अपेक्षा आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकेच समर्थक जर-तर वर असून पद पदरात पडले नाही तर ही सुद्धा मंडळी के. पी. गटात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : 

‘कोल्हापुरात कुणाला पाडायचे, हेच ठरविले जाते’ :
सत्तेची हाव असती तर पर्मनंट केंद्रीय मंत्री असतो; राजू शेट्टी स्वबळावर ठाम
आचारसंहिता भंग तक्रारीवर शंभर मिनिटांत होणार कारवाई

Latest Marathi News ए. वाय. समर्थक ‘के.पीं.’च्या संपर्कात? लवकरच प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.