जळगाव : महाराष्ट्र गीत न वाजल्याने साऊंड सिस्टिम विरुद्ध गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सव व मध्ये उद्घाटन वेळी महाराष्ट्र गीत वाजवले न गेल्यामुळे जिल्हा पेठ पोलिसात राजेंद्र टेन्ट हाऊस व त्यांची टेक्निकल टीम विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेली असून या … The post जळगाव : महाराष्ट्र गीत न वाजल्याने साऊंड सिस्टिम विरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

जळगाव : महाराष्ट्र गीत न वाजल्याने साऊंड सिस्टिम विरुद्ध गुन्हा

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सव व मध्ये उद्घाटन वेळी महाराष्ट्र गीत वाजवले न गेल्यामुळे जिल्हा पेठ पोलिसात राजेंद्र टेन्ट हाऊस व त्यांची टेक्निकल टीम विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेली असून या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे महासंस्कृती महोत्सव बुधवारी (दि.28) रोजी पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ झाला आहे. यावेळी संपूर्ण महोत्सवाच्या साऊंड सिस्टिमची जबाबदारी ही राजेंद्र टेन्ट हाऊस व त्यांच्या टेक्निकल टीमची होती. उद्घाटन वेळी सूत्रसंचालक करणाऱ्या अपूर्वा वाणी यांनी वारंवार सूचना देऊनही महाराष्ट्र गीत वाजवण्यात आले नाही. त्यामध्ये अडथळा निर्माण झाला म्हणून अव्वल कारकून गणेश साळी, जिल्हा परिषद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मक्तेदार राजेंद्र टेंट हाऊस व त्यांची टेक्निकल टीम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा:

महासंस्कृती महोत्सावात दिवसागणीक धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सव, मुक्ताई सरस प्रदर्शनाचे खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते उदघाटन
NMC Solar Power Project | मनपा सोलर प्रकल्पातून २१.९५ लाख युनिट वीजनिर्मिती

Latest Marathi News जळगाव : महाराष्ट्र गीत न वाजल्याने साऊंड सिस्टिम विरुद्ध गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.