१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता
Bharat Live News Media ऑनलाईन : राजस्थानच्या अजमेरमधील टाडा न्यायालयाने आज गुरुवारी लष्कर-ए-तोयबाचा मुख्य बॉम्ब मेकर अब्दुल करीम टुंडा याची १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९३ मध्ये मुंबई, लखनौ, कानपूर, हैदराबाद आणि सुरतच्या काही रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात दोन जण ठार आणि अनेकजण जखमी झाले होते.
या प्रकरणी अजमेरच्या टाडा न्यायालयात हा खटला सुरू होता. या प्रकरणात दहशतवादी अब्दुल करीम उर्फ टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप होते. अब्दुल करीमला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवर पकडण्यात आले होते. टुंडा अजमेर तुरुंगात बंद आहे.
सीबीआयने टुंडा याला साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे म्हटले होते. त्याला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवाद प्रकरणी खटले प्रलंबित आहेत. तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा टुंडावर आरोप आहे. पाकिस्तानी नागरिक जुनैद याच्यासोबत त्याने १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती.
कोण आहे टुंडा?
मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने टुंडाने जालीस अन्सारी सोबत ‘तंजीम इस्लाह-उल-मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना केली होती. मध्य दिल्लीतील दरियागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात त्याच्या मूळ गावी लोहारकाम केले होते. टुंडाचे वडील उदरनिर्वाहासाठी तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियम सारखे धातू वितळवण्याचे काम करत असत. वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने भंगार व्यवसाय सुरू केला. कट्टरपंथी जिहादी दहशतवादी बनण्यापूर्वी त्याने कपड्यांचा व्यवसायही केला. ८० च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला होता.
Ajmer, Rajasthan | TADA (Terrorist & Anti-disruptive Activities Act) court acquits 1993 serial bomb blasts’ main accused Abdul Karim Tunda.
— ANI (@ANI) February 29, 2024
Latest Marathi News १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता Brought to You By : Bharat Live News Media.