कसे होणार जिल्ह्यातील पशुसंवर्धन ?; गोपालक व शेतकर्यांचा प्रश्न ऐरणीवर
गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात 70 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी अडचण येत असून, खासगी डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावे लागत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन कसे होणार? असा प्रश्न पशुपालक व शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Animal Husbandry News)
जिल्ह्यात आठ तालुके असून त्यातंर्गत 41 प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखाने, 30 द्वितीय श्रेणीचे दवाखाने व एक फिरता दवाखाना असे 72 दवाखाने पशुपालकांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र, मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांना उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर पशुपालकांना प्रसंगी खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करुन घ्यावे लागतात. (Animal Husbandry News)
जिल्ह्यात पशुधन विकास अधिकार्यांची 49 पदे मंजूर असताना फक्त 26 पदे भरली आहेत. तर 23 पदे रिक्त आहेत. पट्टेधारकांची मंजूर संख्या 34 असून 23 पट्टेधारक कार्यरत आहेत. तर 11 जागा रिक्त आहेत. पर्यवेक्षकांची 40 पदे मंजूर आहेत. ज्यापैकी 29 पदे भरलेली असून 11 पदे रिक्त आहेत. तर परिचरांची 87 पदे मंजूर असताना त्यापैकी 62 पदे भरलेली आहेत तर 25 पदे रिक्त आहेत. सरासरी 70 टक्के पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील गोपालक, शेतकर्यांच्या पाळीव जनावरांना उपचार घेण्यासाठी खासगी मदत घ्यावी लागत आहे. (Animal Husbandry News)
Latest Marathi News कसे होणार जिल्ह्यातील पशुसंवर्धन ?; गोपालक व शेतकर्यांचा प्रश्न ऐरणीवर Brought to You By : Bharat Live News Media.