Good News..दीपिकाच्या घरी अखेर पाळणा हलणार! आगमनाची तारीख..
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी अखेर पाळणा हलणार आहे. दीपिकाने स्वत: ही गुड न्यूज इन्स्टाग्रामवरून दिली आहे. दोघेही लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून पसरल्या होत्या. (Deepika Padukone) पण दोघांकडूनही कोणतेही वृत्त समोर आले नाही. आता या वृत्तावर दीपिकाने शिक्कामोर्तब केले असून एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सप्टेंबर २०२४ अशी तारीख त्यावर लिहिली असून त्याभोवती बाळाचे चप्पल, बाळाचे कपडे, टोपडे आणि छोट्या-छोट्या वस्तूंचे चित्रे आहेत. दीपिकाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे-🙏🏽🧿🙏🏽 (Deepika Padukone)
हा फोटो शेअर केल्यानंतर इन्स्टाग्रामवर कॉमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिकाची प्रसुती होईल. हे वृत्त समोर आल्यानंतर त्यांचे फॅन्स अभिनंदन करत आहेत. सेलिब्रिटीदेखील दीपिकाच्या पोस्टवर कॉमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत.
क्रिती सेनॉनने लिहिलं आहे-Omg!!!! Congratulations you two!!! ❤❤❤❤🤗🤗, श्रेया घोषालने लिहिलं- Omg!!!! So excited, so happy for you both. Many many congratulations..🩷🩷, सोनाक्षी सिन्हा म्हणते-Your best production yet!!!! So so happy for you both… congratulations ❤❤❤. वरुण धवनने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
तसेच शहनाज गिल, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, सोनू सूद, माधुरी दीक्षित, अमृता खानविलकर या सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)
View this post on Instagram
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)
View this post on Instagram
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)
Latest Marathi News Good News..दीपिकाच्या घरी अखेर पाळणा हलणार! आगमनाची तारीख.. Brought to You By : Bharat Live News Media.