पाच दिवसांची सांस्कृतिक मेजवानी ; जळगावकरांनो घ्या प्रत्यक्ष अनुभती
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकार आणि राज्यातील कलाकार कला सादर करणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित राहून जळगाकरांनी आनंद घ्यावा असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबरच जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे ‘मुक्ताई सरस प्रदर्शन’ आयोजित करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे दि. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यांप्रसंगी खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते महासंस्कृती महोत्सवाचे उदघाट्न करण्यात आले
देशाच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या असून यामध्ये गावागावात प्रशिक्षण देऊन ड्रोनदीदी तयार करणे, महिलांच्या बचत गटांना उमेदच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ सहाय्य,
विकासासाठी अनेक योजना सुरु केल्याचे खा. उन्मेष पाटील यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात दि. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव होऊ घातले आहे. दि. 28 रोजी महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले असून या महोत्सवाचा जिल्हावासीयांनी आनंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. स्थानिक कलाकार यांनी यावेळी वेगवेगळ्या कला सादर केल्या. त्यानंतर सुप्रसिद्ध ‘ महाराष्ट्राची हास्य यात्रा ‘ हा कार्यक्रमाचा देखील रसिकांनी उपस्थित राहून दिलखुलास आनंद लूटला.
Latest Marathi News पाच दिवसांची सांस्कृतिक मेजवानी ; जळगावकरांनो घ्या प्रत्यक्ष अनुभती Brought to You By : Bharat Live News Media.