संदेशखाली प्रकरणी तृणमूलचा नेता शहाजहान शेखला अखेर अटक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित संदेशखाली महिला लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करण्यात आली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर 24 परगणामधील मिनाखान भागातून शेख याला अटक केली.
शहाजहान शेख याला अटक करण्यात आली असून, त्याला बशीरहाट न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती मिनाखानचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिनुल इस्लाम खान यांनी दिली.
Sandeshkhali violence | TMC leader Sheikh Shahjahan arrested by West Bengal Police from the Minakhan area in North 24 Parganas and taken to Basirhat Court: SDPO of Minakhan, Aminul Islam Khan pic.twitter.com/BoerJxFZNJ
— ANI (@ANI) February 29, 2024
उच्च न्यायालयाने दिले होते तृणमूल सरकारला आदेश
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचे लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी प. बंगाल सरकारला दिले होते.
काय आहे प्रकरण ?
पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणी दाखल याचिकांवरील काेलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने आरोपीवर कारवाईस झालेल्या दिरंगाईबाबत सरकारला फटकारले होते. तसेच या प्रकरणी चार वर्षांपूर्वी राज्य पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासालठी चार वर्षे लागली आहेत,” असेही न्यायालयाने सुनावले होते.
Sandeshkhali: TMC leader Sheikh Shahjahan arrested in ‘land grab, sexual assault’ cases
Read @ANI Story | https://t.co/WoxphJeDhY#Sandeshkhali #TMC #SheikhShahjahan #North24Parganas pic.twitter.com/cXfScaddo1
— ANI Digital (@ani_digital) February 29, 2024
Latest Marathi News संदेशखाली प्रकरणी तृणमूलचा नेता शहाजहान शेखला अखेर अटक Brought to You By : Bharat Live News Media.