धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण, 1 लाख 87 हजार बालकांना देणार डोस 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय पोलिओ निमूर्लन कार्यक्रम अंतर्गत रविवार, 03 मार्च रोजी संपूर्ण धुळे जिल्हयात ग्रामीण, शहरी भागात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्हयातील 20 लाख 75 हजार 181 लोकासंख्येतील 1 लाख 87 हजार 567 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार … The post धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण, 1 लाख 87 हजार बालकांना देणार डोस  appeared first on पुढारी.

धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण, 1 लाख 87 हजार बालकांना देणार डोस 

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- राष्ट्रीय पोलिओ निमूर्लन कार्यक्रम अंतर्गत रविवार, 03 मार्च रोजी संपूर्ण धुळे जिल्हयात ग्रामीण, शहरी भागात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्हयातील 20 लाख 75 हजार 181 लोकासंख्येतील 1 लाख 87 हजार 567 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. (Polio Vaccination)
पल्स पोलिओ मोहिमेसंदर्भात जिल्हा टास्कफोर्स समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. बैठकीत सर्व अति जोखमीच्या कार्यक्षेत्राकडे विशेष लक्ष देवून एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावर, तालुका समन्वयक समितीच्या सभा तहसिलदार यांचे ग्रामपंचायत, समाज कल्याण, शासकीय विभाग तसेच स्थानीक स्वयंसेवी संस्था रोटरी, लायन्स क्लब नेहरु युवा केंद्र, एन.एस.एस. महिला मंडळ, बचत गट इत्यादीचे सहकार्य घेण्याचे नियोजन करायचे आहे. जिल्हास्तरावर वैदयकीय अधिकारी जिल्ह्यास्तरावरील अधिकारी, पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण सर्वेक्शन वैदयकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैदयकीय अधिकारी यांचे मार्फत प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर काम करणारे, पर्यवेक्षण करणारे सहाय्यक, सहाय्यीका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, मुख्यसेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक इत्यादीचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेसाठी लागणारे प्रसिध्दी साहित्य पोस्टर्स, बॅनर, स्लिप तयार करुन त्यांना उपयोग करण्यात येणार आहे. पोलिओचे डोस देण्यासाठी लागणारी बायोव्हलेंन्ट पोलिओ लस 2 लाख 72 हजार डोस प्राप्त झालेली असुन तिचे वाटप करण्याचे काम जिल्हास्तरावरुन तालुकास्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहे. शितसाखळी अंबाधीत ठेवण्यासाठी आईस पॅक तयार करण्यात आले आहे. विशेष बाब अंतर्गत महत्वाचे बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, ऊस तोड कामगार, विट भटटी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना पोलिओ देण्यासाठी ट्रान्झीट टिम, मोबाईल टिम यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 5 वर्षांच्या आतील एक ही बालक पोलिओ घेण्यापाचुन वंचीत रहाणार नाही यांची काळजी घेण्यात येणार आहे.
रविवार, 3 मार्च, 2024 च्या मोहीमेसाठी जिल्हयातील 20 लाख 75 हजार 181 लोकासंख्येतील 1 लाख 87 हजार 567 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. मोहिमेसाठी 1 हजार 543 लसीकरण केंद्राचे नियोजन केले आहे. प्रत्यक्ष बुथवर डोस देणे, बालकांना बोलावुन आणणे यासाठी 3 हजार 260 कर्मचारी असणार आहेत. 393 अधिकारी कर्मचारी यांचेमार्फत पर्यवेक्षण केले जाणार आहे. या शिवाय जिल्हास्तरावरील 04 तालुक्यांचे पर्यवेक्षणासाठी स्वंतत्र 10 अधिकारी यांची नेमणुक करुन त्यांचेमार्फत पर्यवेक्षण केले जाणार आहे. महत्वाचे बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट या ठिकाणासाठी 60 ट्रान्झीट टिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भटके कामगार, विटभटटी, उसतोड कामगार, रोड कामगार, यांचे बालकांना पोलिओ देण्यासाठी 108 मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हयातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत 93 वैदयकीय अधिकारी मोहिमेचे यशस्वी नियोजन करत आहे.
तीन दिवस अगोदर करणार प्रचार  (Polio Vaccination)
प्रचार प्रसिध्दी अंतर्गत गावात दवंडी देणे, प्राथमिक केंद्राचे वहानावरुन कार्यक्षेत्रात तीन दिवस अगोदर प्रचार करण्यात येणार आहे. गावातील ग्रामपंचायत, शाळा सहकारी सोसायटी यांचे फलकावर मोहिमेची ठळक प्रसिध्दी करण्यात येत आहे. खाजगी डॉक्टरांना त्यांचेकडे येणाऱ्या पालकांना पोलिओ डोस घेण्यासाठी माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे. शाळेतील बालकामार्फत प्रार्थनेच्या वेळी पल्स पोलिओ मोहिमेची तारीख सुचीत करुन घरी, आजुबाजुला, 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लसीकरण केंद्रावर पोलिओ डोस घेण्यासाठी आणण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटरांना विनंती करुन सत्रांची दिनांक वेळ, ठिकाण, यांची प्रसिध्दी प्रचार करणेत येणार आहे. गावात महिला मंडळ, गटचर्चा करुन मोहिमेचा संदेश पालकापर्यंत पोहचविण्यात यावेत. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी असणाऱ्या उद्घोषना (अलाउंन्समेंट) केंद्रावरुन बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन करण्यात यावे. त्याप्रमाणे धार्मिक ठिकाणाहुन, मशिदीतुन उद्घोषणा करण्यात यावी. पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस घेण्यासाठी लाभार्थी लसीकरण स्लिप वाटप करण्यात येत येवून 03 मार्च 2024 च्या मोहिमेसाठी जिल्हातील सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन पाच वर्षांच्या आतील प्रत्येक बालकांस पोलिओ डोस पाजुन घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, डॉ. तरन्नुम पटेल यांनी केले आहे.
हेही वाचा :

INDvsENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताच्या दोन खेळाडूंना विश्रांती? अहवालात मोठा खुलासा
Arjun Kapoor : ‘निगेटिव्ह शेड्सच्या भूमिका माझ्यासाठी नवं आयुष्य घेऊन आल्या’
ICC Test Rankings : आयसीसी क्रमवारीत जैस्वाल सुसाट! रोहितला टाकले मागे

Latest Marathi News धुळयात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण, 1 लाख 87 हजार बालकांना देणार डोस  Brought to You By : Bharat Live News Media.