Mismatched 3 चे हैदराबादमधील शूटींग संपताच रोहित सराफने BTS केले शेअर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता रोहित सराफने ‘मिसमॅच 3′ चे हैदराबादमधूल शूटिंग पूर्ण केले. (Mismatched 3) यानंतर त्याने BTS शेअर करून त्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. फोटोंमधून रोहित आणि त्याची सह-कलाकार प्राजक्ता कोळी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची उत्तम झलक दिसते. (Mismatched 3)
नेटफ्लिक्स ओरिजिनलमध्ये ऋषी सिंग शेखावत यांच्या भूमिकेमुळे हा अभिनेता प्रसिद्ध झाला आहे. वेब सीरिजमध्ये ऋषीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला रोहित आता या वेब सीरिज साठी उत्सुक आहे. रोहित मुख्य भूमिकेत असून अनेक सह कलाकारांच्या सोबतीने ही वेब सीरिज घडणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)
‘मिसमॅच्ड 3’ व्यतिरिक्त रोहित त्याच्या रॉम कॉम ‘इश्क विश्क रिबाउंड’ च्या थिएटरमध्ये रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटात तो जिब्रान खान, पश्मिना रोशन आणि नैना ग्रेवाल यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसतो. निपुण अधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट 28 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Latest Marathi News Mismatched 3 चे हैदराबादमधील शूटींग संपताच रोहित सराफने BTS केले शेअर Brought to You By : Bharat Live News Media.